शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्रात 30
जूनपर्यंत प्रवेश
हिंगोली,दि.07: शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्र
(हौसिंग सोसायटी, यादव हॉस्पीटलच्या पाठीमागे) अंबाजोगाई, जि. बीड या संस्थेत 2018-2019
या चालू शैक्षणिक वर्षासाठी अपंग मुलांना (अंध, अस्थिव्यंग व मुकबधीर प्रवर्ग)
प्रवेश देणे आहे .
याकरीता मुलांचे वय 6 ते 14 वर्षे या
गटातील असावे., मुलांना अंध, अस्थिव्यंग व मुकबधीर यापैकी कोणत्याही एकाचप्रकारे अपंग असावे आणि मुलांना संसर्गजन्य रोगांनी पिढीत
किंवा मंदबुध्दी असू नये. प्रवेशित अपंग विद्यर्थ्यांना राहणे, जेवणे,
कपडेलत्ते, शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपचार इ. विनामुल्य सुविधा असून तज्ज्ञ,
अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यामार्फत शैक्षणिक, वैद्यकीय उपचार व शारिरीक पुर्नवसन इत्यादी विनामुल्य
शासनामार्फत केले जाते.
तरी गरजूंनी प्रत्यक्ष किंवा
पत्राद्वारे संपर्क साधावा. विहित
नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून दिनांक 30 जून, 2018 पर्यंत
विनामुल्य मिळतील. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख 30, जून, 2018 पर्यंत
राहील.
00000
No comments:
Post a Comment