07 June, 2018

महाबीज तर्फे कृषि कार्यशाळा संपन्न


महाबीज तर्फे कृषि कार्यशाळा संपन्न

            हिंगोली,दि.7: महाबीज हिंगोली, कृषि विभाग व कृषि उत्पन्न बाजार समिती तथा कृषि व्यवसायिक  संघटनेद्वारा  सेनगाव  येथे 02.06.2018  रोजी बालाजी मंदिर  सेनगांव येथे खरीप पिक व्यवस्थापन या विषयावर  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यशाळेस  अध्यक्ष म्हणून  कृषि  उत्पन्न बाजार  समितीचे सचिव  वाघ तर  उद्घाटक  म्हणून  महाबीजचे  विभागीय  व्यवस्थापक एस.पी. गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी  कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूरचे  शास्त्रज्ञ प्रा. राजेश  भालेराव यांनी खरीप पिक व्यवस्थापना विषयी उपस्थित  शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले .
            सोयाबीन पिकाची  हेक्टरी उत्पादकता  वाढविण्याकरिता  योग्य वाणाची निवड जसे MAUS-71, 158, 162  बिज प्रक्रीया , योग्य  जमिनीची  निवड ,  योग्य खत  व्यवस्थापन  व सल्फरचा  वापर या विषयी सखोल  मार्गदर्शन  केले.  एकरी झाडांची संख्या व प्रती  झाडाचे वजन योग्य राखण्यास एकरी 20 क्विंटल पर्यंत  उत्पादन  शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            आत्माचे प्रकल्प उपसंचालक  एम. डी. तिर्थकार यांनी किटकनाशके व तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी निंबाळकर यांनी कृषि विभागाच्या विविध योजना विषयी  सांगितले. गायकवाड यांनी महाबीजच्या विविध वाणाविषयी  माहिती सांगितली.
            अध्यक्षीय भाषणात वाघ यांनी बाजार समिती शेतकऱ्यांकरिता राबवत  असणाऱ्या योजनांविषयी माहिती दिली .  कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक  एस.व्ही. ठाकरे  यांनी केले तर कृषि  व्यवसायिक जिरवणकर  यांनी आभार मानले. यावेळी राज्याचे कृषि मंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यशाळा यशस्वी  करण्याकरिता हरिश झंवर, नंदुशेठ मुंदडा, डॉ. सतिष देशमुख, भागवत जाधव, माधव डुकरे व सुनिल नेतने यांनी परीश्रम घेतले .
0000

No comments: