आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त योगदिनाचे आयोजन
हिंगोली, दि.15:संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे. 5000 वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.
व्यक्तीच्या शारिरीक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासन , जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय , शिक्षणाधिकारी प्राथमिक
, माध्यमिक व पतंजली योगपीठ , हिंगोली यांच्यावतीने चौथ्या
जागतिक योगदिनाचे आयोजन हे तिन योजिले असून दिनांक 19 जून 2018 रोजी
योग शिबिराचे उद्घाटन होणार असून दिनांक
20 जून 2018 रोजी हिंगोली शहरात योगाचा प्रचार
व प्रसार होण्याकरिता योगदिंडीचे आयोजन सकाळी 7.00 वाजता शहरातील विविध मार्गातून करण्यात येणार आहे . दिनांक 21 जून रोजी जिल्हा परिषद प्रशाला , हिंगोलीच्या
मैदानावर सकाळी 6.00 वाजता आंतरराष्ट्रीय योगदिनाचे
आयोजन मान्यवरांच्या व योगसाधक विद्यार्थी
यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. तसेच
या आयोजनामध्ये पावसाचे व्यत्यय आल्यास पर्यायी
व्यवस्था म्हणून नगर पालिकेचे कल्याण मंडपमची
व्यवस्था करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने योगदिनास
सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील
सर्व क्रीडा प्रेमी, योग साधक, अधिकारी, कर्मचारी क्रीडा मंडळे, महिला मंडळे , विविध खेळ संघटना
, सामाजिक संघटना , युवक संघटना , शाळा , महाविद्यालय यांना आवाहन
करण्यात येत आहे की त्यांनी या योगदिनानिमित्त दिनांक 21 जून 2018 रोजी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या योगदिनाचा लाभ घ्यावा . या योगदिनामध्ये सर्वांसाठी योग, योगाचे महत्व , आरोग्यासाठी योग प्रात्यक्षिकासह आयोजन करण्यात येणार असून तज्ञमार्गदर्शकांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
करिता आंतरराष्ट्रीय
योगदिनानिमित्त सर्वांनी उपस्थित राहून
या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा लाभ घ्यावा , असे आवाहन शिक्षणाधिकारी श्री. सोनटक्के आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पवार यांनी केले आहे
.
00000
No comments:
Post a Comment