सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुरक्षा जवानांची महाभरती
हिंगोली, दि. 08:- सुशिक्षित बेरोजगांराना
खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली व एस.आय.एस.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
कमीत कमी 10 वी उत्तीर्ण वय :- 18-37 वर्षे
वजन किमान 50 कि.ग्रॅ उंची :- 168 सें.मी. पेक्षा जास्त असलेल्या फक्त पुरुष उमेदवारांसाठी
खाजगी सुरक्षा रक्षकांची 700 पदे भरावयाची आहेत.
रिक्तपदे रोजगार मेळाव्याव्दारे दिनांक
11ते 13 जून 2018 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
प्रशासकीय इमारत एस-3, 2 रा माळा, हिंगोली
व 14 ते 16 जून 2018 रोजी जि.प. हायस्कूल,
कळमनूरी येथे सकाळी 09.00 ते 01.00 या वेळेत भरती आयोजित केली आहे.
रोजगार मेळाव्याच्या भरतीसाठी येताना उमेदवारांनी
शैक्षणिक प्रमाणपत्राच्या दोन झेरॅाक्स प्रती व दोन पासपोर्ट फोटो तसेच उमेदवारांनी
mahaswayam.in या संकेतस्थळावर मेळाव्यासाठी अप्लाय करून त्याची झेरॉक्स प्रत सोबत
आणावी
नोकरीवर हजर/रुजू झाल्यावर संबधितास किमान
वेतन रु.8000/- ते 19000/- दरमहा मिळेल तसेच पी.एफ, पुर्ण परिवाराकरिता मोफत वैद्यकिय
सुविधा, ग्रॅच्युटी, वेतनवाढ, प्रमोशन, टिए/डिए, चार्जेबल मेस इत्यादी, सुविधा एस.आय.एस.इंडिया
सेक्युरिटी लि. पुणे या कंपनी तर्फे लागू होतील गरजू व इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या
महाभरतीत मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे. नोकरीस इच्छूक व गरजू उमेदवारांनी भ्रमनध्वनी
क्रमांक 8975905099, तसेच (02456) 224574 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment