हंगामाच्या
काळात खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास
तक्रार करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 2 : राज्य शासनाने दि. 27 एप्रिल, 2018 च्या शासन निर्णयाव्दारे
कंत्राटी वाहनांचे ( खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ. ) महत्तम भाडेकर निश्चित केले आहेत.
हा शासन निर्णय त्वरित प्रभावाने अंमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून
जर विहित दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्याविषयी मोटार वाहन
विभागाच्या 022-62426666 या निशुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात यावी,
असे परिवहन आयुक्त कार्यालय यांच्याव्दारे कळविण्यात आलेले आहे. मुंबईसाठी 18800220110
या निशुल्क क्रमांकावरही तक्रार नोंदविता येईल.
तसेच
अशी तक्रार विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in
या संकेतस्थळावर देखील नोंदविता येऊ शकेल. तक्रारी संदर्भाने उचित चौकशी अंती
संबंधित कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर निलंबनाची /रद्द करण्याची कारवाई
करण्यात येईल. या शासन निर्णयाव्दारे खाजगी कंत्राटी वाहनांना (खाजगी बस, ट्रॅव्हल्स
इ. ) गर्दीच्या हंगामाच्या काळात एस. टी. बसच्या तुलनेत जास्तीत-जास्त दीडपट भाडे
आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे
आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment