पाणी पुरवठा व स्वच्छता
मंत्री
बबनराव लोणीकर यांचा दौरा
हिंगोली, दि. 5 : राज्याचे पाणी पुरवठा व
स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
बुधवार, दि. 06 जून, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता
परळी जि. बीड येथून मोटारीने औंढा नागनाथ जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 2.00
वाजता औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी
3.30 वाजता औंढा नागनाथ नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या भूमीपूजन / उदघाटन
कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता मोटारीने जालन्याकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment