राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम – 2013
अंतर्गत जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी यांची
तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती
हिंगोली, दि. 27 : केंद्र शासनाच्या
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योजनांची परिणामकारक अंमलबजावणी
करण्याच्या दृष्टीने राज्य अन्न आयोगाची स्थापना झाली असून शासनाने दि. 07 एप्रिल,
2017 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी यांची तक्रार
निवारण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी यांचे स्तरावर त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांचा
समावेश करून एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून अधिनियमामध्ये अभिप्रेत असलेली तक्रार
निवारण यंत्रणा उभी करून तक्रार निवारणाचे कामकाज हाताळण्याच्या शासनाच्या सुचना
आहेत. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचारी यांचे मिळून
तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत असून आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील उपविभागीय
अधिकारी, तहसिलदार व अन्य यंत्रणा यांची चौकशी कामी मदत घेण्याचे याव्दारे आदेशीत
करण्यात येत आहे. सदर कक्ष अप्पर जिल्हाधिकारी यांचे कक्षात कार्यरत राहील. सदर कक्षाकरिता
02456-221466 हा दुरध्वनी क्रमांक व addcoll.hingoli@gmail.com
हा ई-मेल पत्ता वापरात घेण्यात यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment