केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांगांना
साहित्याचे वितरण
हिंगोली, दि. 6 : केंद्रीय
सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 626 पात्र
दिव्यांगाना वेगवेगळ्या प्रकारचे 1 हजार 10 साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणीताई
नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार संतोष टारफे, माजी मंत्री रजनीताई सातव, समाजकल्याण
सभापती गयबाराव नाईक, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसिलदार प्रतिभा गोरे,
एलिम्को संस्थेचे श्री. गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. आठवले पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्राच्या
विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत
राहील. प्रत्येक नागरिकांनी दिव्यांग जनांना मदत केली पाहीजे. दिव्यागांना 3 टक्के
आरक्षणावरून नौकरीमध्ये 4 टक्के आणि
शिक्षणामध्ये 5 टक्के आरक्षण आहे. तसेच दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता
शासनामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. आठवले यांनी
यावेळी म्हणाले.
यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांगन आणि
नागरिकांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment