सामाजिक
न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी समता दिंडीचे आयोजन
हिंगोली,दि.25: राज्य शासनाने राजर्षी छत्रपती
शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून सर्वत्र
साजरा करण्यात येतो. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडीचे उद्घाटन
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या
हस्ते होणार आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी ही
माहिती दिली.
तसेच डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे जिल्हास्तरीय सामाजिक न्याय
दिन कार्यक्रमाचे सकाळी 11 वाजताआयोजन करण्यात आले आहे. सदर जिल्हास्तरीय
कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव,
आमदार सर्वश्री रामराव वडकुते, विक्रम काळे, सतिश चव्हाण, विप्लप बाजोरीया, डॉ.
जयप्रकाश मुंदडा, तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर,
जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे उपायुक्त बी. एस. केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
सदर
कार्यक्रमातंर्गत मागासवर्गीयांच्या विविध योजना अंतर्गत पात्र लाभर्थ्यांना
मान्यवरांच्या हस्ते लाभान्वीत करण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी या सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी
होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे असे आवाहन सहाय्यक आयुक्त भाऊराव
चव्हाण, डॉ. छाया कुलाल आणि गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment