लहान
मुलांच्या शौर्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.21: लहान मुलांच्या शौर्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार योजना 60
वर्षापुर्वी 1957 ला सुरू करण्यात आली. या अंतर्गत एक मुलगा एक मुलगी यांना
त्यांच्या समचसुचकतेसाठी सन्मानित केले जाते.
सदर पुरस्कार देण्यामागचा मुख्य
उद्देश हा की, मुलांनी केलेल्या कार्यास प्रोत्साहन मिळावे व त्याप्रमाणे
इतरांनीही त्यांचे अनुकरण करावे. या पुरस्कारासाठी सर्व विभागाकडून माहिती मागविली
जाते तसेच पोलीस विभागाकडून ही माहिती घेतली जाते. सदर पुरस्कारासाठी विहित
नमुन्यात अर्ज मागविले जातात. अर्जासोबत 250 शब्दात केलेल्या कार्याचे विवरण देणे
अपेक्षित आहे. तसेच नामांकन अर्जासोबत जन्माचा दाखला सदरची बातमीचे कात्रण तसेच पोलीसाचा
प्रथम खबरी अहवाल किंवा पोलीस डायरीतील नोंद या बाबींची पुर्तता होणे आवश्यक आहे.
तसेच सदर घडलेल्या घटनेचा अहवाल हा सदर्भीय विभागाने शहानिशा करून देणे अपेक्षित
आहे.
सदर
पुरस्कार हा फक्त 6 ते 18 वयोगटातील मुलगा किंवा मुलगी यांना देण्यात येईल. या
नामांकनासाठी पुढील 2 व्यक्तींची शिफारस आवश्यक आहे. 1) अर्जदार ज्या शाळेत शिक्षण
घेत आहे. त्या शाळेचे मुख्याध्यापकांनी शिफारस करावी. 2) मुलांच्या विकासासाठी
कार्यरत एखाद्या कमिटीचे अध्यक्ष किंवा सदस्य सचिवांनी शिफारस करावी. 3) जिल्हाधिकारी
/ जिल्हा न्यायदंडाधिकारी / समान स्तरावरील इतर शासकीय संस्था यांनी शिफारस करावी.
4) पोलीस अधिक्षक / सदर कार्यक्षेत्राचे पोलीस अधिक्षक किंवा त्यापेक्षा
उच्चस्तरीय पोलीस अधिकारी यांनी शिफारस करावी.
सदर घटना ही दि. 1 जुलै, 2017 ते 30 जून, 2018 या कालावधीत
घडलेली पाहीजे तेव्हा अर्ज 2017 च्या पुरस्कारासाठी ग्राह्य राहील. सदर अर्ज करण्याचा
शेवटचा दि. 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत आहे. निवड प्रक्रिया ही उच्चस्तरीय समितीकडून
केली जाईल. समितीने एकदा नाकरलेले प्रकरण परत विचाराधीन राहणार नाही.
अर्ज केल्याने निवड होईलच यांची
शाश्वती धरु नये योग्यतेनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल. सदर सर्व
प्रक्रियेबाबतची माहिती वेबसाईट www.iccw.co.in
या संकेतस्थळावर मिळेल व आपले अर्ज iccw.delhi@gmail.com
व iccw@bol.net.in यावर पाठवावे, असे आवाहन
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment