05 June, 2025
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण
हिंगोली (जिमाका), दि. 05 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणामुळे परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे सुशोभिकरण व्हावे. यासाठी जिल्हा प्रशासन 5 स्टार हिंगोलीकर हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये हाती घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंगोली नगर परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप जगताप, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी प्रकाश साबळे, शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची चळवळ ही संपूर्ण जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.
या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच येथील नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment