ईव्हीएम सुरक्षा कक्षाच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया
कलम 144 लागू
हिंगोली, दि.16: भारत निवडणुक आयोग यांचेकडून सन-2019 लोकसभा
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित
करण्यात आला आहे. सदरील निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार या कार्यालयाची अधिसूचना
दिनांक 10 मार्च, 2019 अन्वये 15- हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये गुरुवार दिनांक
18 एप्रिल, 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर
15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील 82-उमरखेड, 83-किनवट, 84-हदगांव, 92-वसमत,
93-कळमनुरी, 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे सिलबंद ईव्हीएम मशीन शासकीय
तंत्रनिकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता, औंढा नागनाथ रोड , हिंगोली येथे स्थापन
करण्यात आलेल्या सुरक्षा कक्ष मध्ये ठेवण्यात येणार आहेत. सदरील सुरक्षा कक्षाच्या
परिसरात आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होणार नाही तसेच सदरील परिसर शांततामय
राहण्याच्या दृष्टाकोनातून ईव्हीएम मशिन सुरक्षा कक्षच्या 200 मीटर परिसरातील
पक्षकारांची मंडप उभारणे व ज्या परिसरातील सर्व दूकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन,
पेजर, वायरलेस, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू ठेवण्यास तसेच
निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहने,
निवडणुकीच्या कर्तव्यावरील इसमा व्यतिरिक्त इतर इसमांना प्रवेश करण्यास
प्रतिबंध करण्यात आला आहे.
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये हिंगोली
येथे 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या
सिलबंद ईव्हीएमसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाच्या 200 मीटरच्या परिसरात दिनांक 18 एप्रिल, 2019 चे 00.00 वाजे
पासून ते दिनांक 23 मे, 2019 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील. तसेच हे
प्रतिबंधात्मक आदेश निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस
अधिकारी-कर्मचारी यांना व निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना लागू
राहणार नाहीत, असे रुचेश जयवंशी, जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment