नियंत्रण
कक्षाची स्थापना
हिंगोली, दि.16: राज्यातील लोकसभा मतदार संघातील दुकाने व
आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे,
नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या,
शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत मतदारांना मतदानाच्या
दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे शासनाचे निर्देश
आहेत. त्या अनुषंगाने सुविधाकार तथा मुख्य समन्वयक एस. के. भंडारवार यांच्या अधिपत्याखालील
नांदेड, हिंगोली व परभणी लोकसभा मतदार संघनिहाय
नियंत्रण कक्ष/दक्षता कक्ष स्थापन करण्यात
करण्यात आली आहे.
हिंगोली
लोकसभा मतदार संघाकरिता माथाडी लेखापाल तथा नियंत्रण कक्ष प्रमुख वसंत पाटील (मो.9890561687),
माथाडी लिपिक तथा नियंत्रण कक्ष सहायक एम.एम. नाईक (मो.9623922867) तर शिपाई तथा नियंत्रण
कक्ष सहायक उत्तम बलकुते (मो.8007901738) यांची या नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात
आली आहे. हे नियंत्रण कक्ष दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सायंकाळी
6 वाजेपर्यंत कार्यरत राहील, असे सहायक कामगार आयुक्त, नांदेड यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment