पेड न्यूज प्रकरणी दोन उमेदवारांना नोटीस
· समितीमार्फत आतापर्यंत 4 उमेदवारांना 7 तर इतर 18
जणांना नोटीसा
हिंगोली,
दि.13: 15-हिंगोली
लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूकीतील राजकीय पक्ष आणि
उमेदवारांच्या दैनंदिन प्रचाराच्या प्रसिध्द होणाऱ्या
मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयीत पेड न्युजवर माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती मार्फत
लक्ष ठेवून
योग्य कार्यवाही करण्यात येत आहेत.
15-हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या
अपक्ष उमेदवार त्रिशला मिलिंद कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची
उमेदवारी अवैध ठरविण्यासाठी शिवसेना पक्षासोबत कट रचून, पत्रकार परिषदेचे आयोजन करुन
पत्रकारांना बातमीच्या बदल्यात जाहिराती किंवा पैसे देवून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या
विरोधात बातम्या प्रसिध्द करण्याबाबतची तक्रार पुराव्यासह निवडणूक विभागास प्राप्त
झाली होती. त्यानुसार काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची उमेदवारी अवैध ठरविण्याबाबतची
बातमी काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक यांना
प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार अपक्ष उमेदवार त्रिशला मिलिंद कांबळे यांना सदर प्रकरणांबाबत
पैसे व जाहिरातीचे आमिष दाखवून छापून आणलेल्या बातम्यांचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात
का समाविष्ट करु नये? अशी विचारणा समितीने केली आहे. तसेच या प्रकरणाबाबत निवडणूक विभागास
प्राप्त झालेल्या पुराव्यात शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या नावांचा उल्लेख
आला असल्याने त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? तसेच छापून आणलेल्या बातम्यां पेड
न्यूज म्हणुन गृहीत का धरु नये? आणि त्याचा खर्च आपल्या निवडणूक खर्चात का समाविष्ट
करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली आहे.
तसेच शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या
प्रचारार्थ तामसा ता. हदगाव, जि. नांदेड येथे झालेल्या प्रचार सभेचे वृत्त बुधवार दि.
10 एप्रिल, 2019 रोजीच्या दैनिक लोकमत आणि दैनिक देशोन्नती या वृत्तपत्रात ‘उमेदवार
म्हणुन आम्ही पाठीशी-सुर्यकांता पाटील’ मथळ्याखाली समान मजकुर असलेले वृत्त प्रसिध्द
झाले आहे. याकरीता सदर वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्त पेड न्यूज म्हणुन गृहीत
का धरु नये? आणि त्याचा खर्च आपल्या निवडणूक खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये?
अशी नोटीस बजावली आहे.
यापूर्वी माध्यम, प्रमाणन व संनियंत्रण
समितीकडून प्रमाणित करुन न घेता समाज
माध्यमावर निवडणूकीचा प्रचार-प्रसार केल्याबाबत
4 उमेदवारांना 07 आणि व्हॉट्स ॲपचा गैरवापर करुन प्रचार-प्रसिध्दी केल्याने 18 जणांना
समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी नोटीस बजावली आहे.
*****
No comments:
Post a Comment