मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत
हिंगोली,दि.15: लोकसभा सार्वत्रिक
निवडणुक-2019 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता दूसऱ्या टप्प्यात
गुरुवार, दि. 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान
करता यावे, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांनी
दि. गुरुवार, दि. 18 एप्रिल, 2019 रोजी
सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याचे यापूर्वीच कळविले आहे.
लोकसभा निवडणुकीत
कामगारांना मतदान करता यावे, यासाठी निवडणुक क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना,
निवासी हॉटेल, व्यापार, औद्योगिक उपक्रम व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना
मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा अपवादात्मक अत्यावश्यक
सेवेत (प्रोसेसिंग/ उत्पादन प्रक्रीया असल्यास) जिल्हाधिकारी किंवा मनपा आयुक्त
यांच्या पूर्व परवानगीने दोन तासांची सवलत
देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment