जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मी मतदान करणारच’ स्वाक्षरी
मोहीम
हिंगोली,दि.1: लोकसभा
सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 15-हिंगोली मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून, दूसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्व असून, प्रत्येक
पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावलाच पाहिजे. याकरीता हिंगोली जिल्ह्यात मा. भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृतीसाठी `सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन
अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) मोहीम राबविली जात आहे. नव मतदारांना मतदानाचे
महत्त्व सांगुन मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी स्वीप महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
नागरिकांना मतदान करण्याची जबाबदारी कळावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ‘मी मतदान करणारच…! इतराना ही सांगणार’ असे
घोषवाक्य असलेला फलक लावून त्यावर स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे. या अनुषंगानेच आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी
मेाहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, नियोजन अधिकारी
विनोद कुलकर्णी, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी
अरुण सुर्यवंशी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक
संचालक रेणुका तम्मलवार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, नायब तहसीलदार राजेंद्र गळगे
आदींची उपस्थिती होती.
हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या स्वीप समितीने
मतदार जनजागृतीचा आराखडा तयार केला असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार संघात
विविध स्पर्धा, उपक्रम, कलापथक, प्रसिद्धी माध्यमे या माध्यमातून जनजागृती करून मतदारांना
मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment