एमएचटी-सीईटी 2019 परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने
* 2 ते 13 मे या कालावधीत होणार परिक्षा
* परिक्षा केंद्रावर फौजदारी
प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू
* हिंगोली येथील न्यू मॉडल डिग्री कॉलेज येथे होणार ऑनलाईन परिक्षा
* परिक्षार्थी उमेदवारांनी अधिकृत एक ओळख पत्र सोबत आणाणे आवश्यक.
हिंगोली,दि.30: शैक्षणिक वर्ष
2019-20 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी औषध
निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
एमएचटी-सीईटी 2019 ही प्रवेश परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने न्यू मॉडल डिग्री
कॉलेज औंढा रोड, हिंगोली या ठिकाणी परीक्षा होणार आहे. सदर परीक्षा दिनांक 2 ते 13
मे, 2019 (दिनांक 4 व 5 मे, 2019 हे दोन दिवस वगळून) सकाळ सत्राची वेळ 7.30 ते
1.45 पर्यंत व दुपार सत्राची वेळ 12.30 ते 6.45 पर्यंत या वेळेत होणार आहे.
सदर परीक्षा
सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा
केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल
फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने
म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर
कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास
अथवा स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनी परिक्षेस
येतांना आपले प्रवेश पत्र (हॉल टिकिट) तसेच राज्य सामाईक प्रवेश परिक्षा
कक्षामार्फत सूचित केलेल्या कोणते ही
छायाचित्र आसलेले एक अधिकृत ओळखपत्राची मुळ (ओरिजनल) प्रत (आधार कार्ड, पॅन
कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळख पत्र, बॅंकेचे पास बुक इत्यादी)
सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्या नावांत बदल झालेला असेल त्यांनी गॅझेट
नोटीफिकेशन, विवाह प्रमाणपत्र किंवा नांव बदला बाबतचे शपथ पत्र यापैकी एक पुरावा
सोबत आणावा.
सदर अभियांत्रिकी
औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
होणाऱ्या एमएचटी-सीईटी 2019 ही प्रवेश परीक्षा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने न्यू मॉडल
डिग्री कॉलेज या ठिकाणी होणार असल्याने सदर परिक्षा केंद्राची पूर्वतयारी बाबतचा
आढावा आज अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, पॉलिटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य श्री. पाटील यांनी घेतला.
सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या
दृष्टीकोणातून परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती हाताळण्यासाठी
परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार
आहे, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment