23 May, 2018

जात प्रमाणपत्र वितरणाकरीता शिबीराचे आयोजन

जात प्रमाणपत्र वितरणाकरीता शिबीराचे आयोजन

हिंगोली,दि.23: विशेष मोहिमेतंर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्यावतीने माहे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील विद्यार्थी, सेवा, निवडणूक इत्यादी लाभार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी संचयीकेची तपासणी करुन जवळपास 1 हजार 595 जात वैधता प्रमाणपत्र तयार केली आहेत. सदर कालावधीत एकूण सेवा विषयक 103 जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक 1 हजार 427  तथा निवडणूक विषयक 65 जात वैधता प्रमाणपत्र तयार केली आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत संबंधित लाभार्थ्यांना  एस.एम.एस. द्वारे संदेश देऊन तथा स्पिडपोष्टाद्वारे काही प्रमाणपत्र संबंधीतांना वितरीत करण्यात आली आहे.
या व्यतीरिक्त वरील कालावधीतील उर्वरित सर्व जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेतंर्गत दिनांक 23 ते 25 मे, 2018 या कालावधीत जात प्रमाणपत्र वितरणाचे शिबीर आयोजित केलेले आहे. आज रोजी एकूण 450 ते 500 जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली येथे प्रत्यक्ष येऊन आपले होऊन जात वैधता प्रमाणपत्र येत्या दोन दिवसात नेण्याचे आवाहन एस.एम.एस. द्वारे सर्व लाभार्थ्यांना करण्यात आले आहे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी केले आहे .
0000

21 May, 2018

जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

हिंगोली, दि.21: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, हिंगोली तसेच नेहरु युवा व सांस्कृतिक  क्रीडा मंडळ, खरबी ता. जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसांचे निवासी  जिल्हा युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 30 मे ते 8 जून, 2018 या कालावधीत माधव लॉन,  मंगल कार्यालय, जवळा पळशी रोड, हिंगोली येथे करण्यात आले आहे. सदर शिबीर हे निवासी  शिबीर असून, यामध्ये जीवन कौशल्य, रोजगार मार्गदर्शन, शासकीय योजना, कायदेविषयक माहिती, युवकांसाठी आरोग्य, समुपदेशन, भारताचा इतिहास, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी पर्यावरण व अनुषंगिक इतर विषयांचा समावेश आहे.
यासाठी  हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक प्रशिक्षणार्थींची नावे मागविण्यात येत आहेत. तरी नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएस, जिल्ह्यासाठी युवा संस्था व शाळा महाविद्यालये  यांनी त्यांचेकडील इच्छुक  प्रशिक्षणार्थींना सहभागी होण्यासाठी युवक व युवतीने आपले नाव, जन्म दिनांक, पत्ता मोबाईल क्रमांकासह त्वरीत  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास  कार्यालयीन वेळेत दिनांक 28 मे 2018 पर्यंत पाठविण्यात यावेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी , श्री. पवार यांनी कळविले आहे .
000000

पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करण्याच्या बँकांना सूचना-जिल्हा अग्रणी बँक

पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करण्याच्या बँकांना सूचना
                                                                -जिल्हा अग्रणी बँक

हिंगोली,दि.21: खरीप व रब्बी हंगाम सन 2018-19  या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याचा पीककर्ज वितरणाचा वार्षिक वित्त आराखडा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला आहे. तसेच मंजूर वित्त आराखड्याची प्रत जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकांना तसेच विविध खाजगी बँकांना दि. 1 एप्रिल, 2018 रोजी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दि. 16 मे, 2018 पर्यंत जिल्ह्यातील विविध बँक शाखामार्फत 1850 शेतकऱ्यांना 11 कोटी 94 लाख रुपयाचे पिक कर्ज वितरण करण्यात आले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व बॅंकांना स्पष्ट सूचना ही देण्यात आल्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होण्याची परिस्थिती होणार नाही, असे व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, यांनी खुलासाद्वारे कळविले आहे.

****

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा

        हिंगोली,दि.21: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणुन पाळला जातो. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.
             यावेळी अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांची  उपस्थिती होती.
****