जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
हिंगोली, दि.21: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली तसेच नेहरु
युवा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, खरबी ता. जि.
हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसांचे निवासी जिल्हा युवा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक
30 मे ते 8 जून, 2018 या कालावधीत माधव लॉन,
मंगल कार्यालय, जवळा पळशी रोड, हिंगोली येथे करण्यात आले आहे. सदर शिबीर हे
निवासी शिबीर असून, यामध्ये जीवन कौशल्य, रोजगार
मार्गदर्शन, शासकीय योजना, कायदेविषयक माहिती, युवकांसाठी आरोग्य, समुपदेशन, भारताचा
इतिहास, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी पर्यावरण व अनुषंगिक इतर विषयांचा समावेश आहे.
यासाठी हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक प्रशिक्षणार्थींची
नावे मागविण्यात येत आहेत. तरी नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएस, जिल्ह्यासाठी
युवा संस्था व शाळा महाविद्यालये यांनी त्यांचेकडील
इच्छुक प्रशिक्षणार्थींना सहभागी होण्यासाठी
युवक व युवतीने आपले नाव, जन्म दिनांक, पत्ता मोबाईल क्रमांकासह त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास कार्यालयीन वेळेत दिनांक 28 मे 2018 पर्यंत पाठविण्यात
यावेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी , श्री. पवार यांनी कळविले आहे .
000000
No comments:
Post a Comment