बीज प्रकियेवर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन
हिंगोली, दि.15: येथील
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व महाराष्ट्र उद्योजकता
विकास केंद्र, हिंगोली यांच्या
संयुक्त विद्यमाने बीज प्रक्रीयेवर आधारीत 12 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक 29 मे, 2018 ते दिनांक 9 जून, 2018 या कालावधीत आयोजीत करण्यात येत आहे. हा
प्रशिक्षण कार्यक्रम बीज प्रक्रीया केंद्र एम.आय.डी.सी. लिंबाळा, हिंगोली येथे
बियाणे प्रक्रीया मशिनरी तथा तेथील उपकरणाची कार्यप्रणाली, बियाण्यांचे भांडारण
तसेच बियाणे पात्रतेचे निकष व प्रमाणित बियाणे म्हणजे काय इत्यादीबाबत
सविस्तर प्रशिक्षण महाबीजचे अधिकारी
यांच्याद्वारे दिल्या जाईल. तसेच सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास
शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली आदींबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्या शेतकरी युवक व
युवतींना व शेतकरी गट यांना सशुल्क प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 60, शिक्षण 5 वी पास, प्रवेशाची अंतिम
तारीख 25 मे, 2018 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत श्री. अरुण कोंडेकर जिल्हा
असिस्टंट मो.क्र.( 8698770678) एमसीईडी, जिल्हा कार्यालय द्वारा जिल्हा उद्योग
केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला
अर्ज सादर करावा, असे आवाहन व्यवस्थापक
बीज प्रक्रीया केंद्र एम.आय.डी.सी. हिंगोली व प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र , हिंगोली यांनी केले आहे .
00000
No comments:
Post a Comment