जिल्हास्तरीय
समितीमध्ये अशासकीय
सदस्याच्या
नियुक्तीकरीता अर्जाची मागणी
हिंगोली, दि.18: बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 च्या
कलम 54 नुसार संस्थांच्या तपासणीसाठी राज्य
व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णयान्वये महिला व बाल विकास
विभाग दिनांक 21 मार्च 2018 नुसार निर्गमित करण्यात आलेला आहे .
जिल्हास्तरावरील तपासणी समितीमध्ये अशासकीय
व्यक्तीच्या नियुक्ती करणे आवश्यक आहे. सदर अशासकीय सदस्याने खालील अटींची पुर्तता
करणे आवश्यक आहे. सदर व्यक्ती किमान पदवीधर असावे, त्यास/तिस बाल हक्क, काळजी, संरक्षण
आणि कल्याण क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. तसेच त्याचे/तिचे वय
35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे, सदरची नेमणूक ही तीन वर्षांच्या कालावधी पर्यंत राहील.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज
बायोडाटा व अनुभव विषयक पुराव्यासह या कार्यालयास
दिनांक 22 मे, 2018 सायं. 5.00 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,
हिंगोली एस-7 दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली-431513 येथे स्वत: सादर
करणे आवश्यक आहे. दिनांक 22 मे, सायं.5.00 नंतर आलेले प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत याची
नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
000000
No comments:
Post a Comment