हिवताप प्रतिरोध महानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि.30: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध
महिना जून 2018 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी (डेंगू, चिकुनगुनिया,
जे.ई. चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्याचा प्रतरोध उपाय
योजनाच्या अंमलबजावणीमध्ये सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक
वर्षी विविध उपक्रमाद्वारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये
गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय योजनाची माहिती
योग्य त्या माध्यमाद्वारे पोहचविणे आवश्यक आहे,
डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनामध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश
आहे.
यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण,
हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, ग्रामीण
आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्वस्तरावरुन स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन,
डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक
कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकासाठी सामाजिक जाणीव, सर्वस्तरावरील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व
एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनजागृती
जनतेमध्ये निर्माण करणे.
तरी हिंगोली जिल्ह्याअंतर्गत सर्व आरोग्य
संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित
नागरीक, यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवरील सदरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात
यावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment