महाराष्ट्र दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
हिंगोली, दि.1: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा
निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर, जिल्हा
नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment