जिल्ह्यासाठी
984.45 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर
हिंगोली,
दि. 24 :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हिंगोली जिल्हयातील अंत्योदय
शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी
नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या महिन्यात
जिल्ह्यासाठी 984.45
क्विंटलचे
नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष
शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार
आहे.
तालुका
निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. हिंगोली-
261.45, औंढा ना.-129, सेनगाव-207, कळमनुरी-207, वसमत-180 , याची सर्व अंत्योदय
शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन
जिल्हा पुरवठा अधिकारी ,हिंगोली यांनी
केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment