दिनांक: 01 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत
छायाचित्र मतदार
याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
हिंगोली,
दि.15:-भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्र.
No.23/LET/ECI/FUNC/ERD-ER/2018, दिनांक: 07 मे, 2018 अन्वये दि.
"01 जानेवारी, 2019" या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार
यांद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक: 15 मे, 2018 ते दिनांक: 04 जानेवारी, 2019 या कालावधीत राबविण्याचे घोषीत
करण्यात आले असून, छायाचित्र मतदार यांद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रम जिल्ह्यातील 92- वसमत, 93- कळमनुरी व 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघात
उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सर्व
तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे
स्तरावर मतदार नोंदणी हस्तपुस्तीका 2016 मधील निर्देशान्वये राबविण्यात येणार आहे.
दिनांक: "01 जानेवारी, 2019" या अर्हता
दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यांद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रमाचे टप्पे पुढिल प्रमाणे आहेत.
अ.क्र.
|
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
|
कालावधी
|
1
|
BLO मार्फत घरो-घरी भेटी देवून मतदारांची पडताळणी करणे.
|
दि. 15 मे, 2018 (मंगळवार) ते
दि. 20 जून, 2018 (बुधवार)
|
2
|
मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण
व मतदान केंद्राच्या इमारतीची प्रत्यक्ष पडताळणी करणे
|
दि. 21 जून, 2018 (गुरूवार) ते
दि. 31 जुलै, 2018 (मंगळवार)
|
3
|
कंट्रोल टेबलचे अद्यावतीकरण, पुरवणी मतदार याद्यांचे मर्जिकरण
करून प्रारूप मतदार याद्या तयार करणे.
|
दि. 01 ऑगस्ट, 2018 (बुधवार) ते
दि. 31 ऑगस्ट, 2018 (शुक्रवार)
|
4
|
मर्जिकरणांती तयार झालेल्या
प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करणे
|
दि. 01 सप्टेंबर, 2018
(शनिवार)
|
5
|
मतदार म्हणून
नोंदणीस पात्र नागरिकांकडून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी
|
दि. 01 सप्टेंबर, 2018
(शनिवार) ते
दि. 31 ऑक्टोबर, 2018
(बुधवार)
|
6
|
प्राप्त दावे व हरकती
निकाली काढण्याचा कालावधी
|
दि. 30 नोव्हेंबर,
2018 (शुक्रवार) रोजी पुर्वी
|
7
|
डाटाबेसचे अद्यावतीकरण
करून पुरवणी याद्यांची छपाई करणे
|
दि. 03 जानेवार, 2019
(गुरूवार) रोजी पुर्वी
|
8
|
मतदार याद्यांची अंतिम
प्रसिध्दी
|
दि. 04 जानेवारी, 2019
(शुक्रवार)
|
2) दि. 01.01.2018 या अर्हता दिनांकावर
अधारीत अंतिम मतदार यादीत विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची आकडेवारी पुढील
प्रमाणे आहे.
अ.क्र.
|
विधानसभा मतदार संघाचा क्रमांक व नाव
|
मतदान केंद्रे
|
मतदार संख्या
|
मतदार यादीतील छायाचित्रांची टक्केवारी
|
मतदार यादीतील छायाचित्र ओळखपत्राची (EPIC) टक्केवारी
|
||
पुरूष
|
स्त्री
|
एकूण
|
|||||
1
|
92- वसमत
|
314
|
145229
|
132539
|
277768
|
99.44
|
99.52
|
2
|
93- कळमनुरी
|
336
|
154278
|
137890
|
292168
|
97.69
|
97.96
|
3
|
94- हिंगोली
|
321
|
157478
|
141863
|
299341
|
96.29
|
96.85
|
एकूण
|
971
|
456985
|
412292
|
869277
|
97.77
|
98.07
|
3) मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) मार्फत मतदारांची पडताळणी:- सदर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्यात दि. 15 मे, 2018 ते दि. 20 जून, 2018 या
कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत घरो-घरो भेटी देवून मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. घरो-घरी भेटी दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) प्रत्येक कुटूंबाची खालीलप्रमाणे माहिती गोळा करणार आहेत.
a)
दि. 01.01.2018 या अर्हता दिनांकावर
मतदार नोंदणीस पात्र असलेले परंतु मतदार नोंदणी पसून वंचित राहीलेल्या नागरीकांची माहिती
गोळा करणे.
b)
दि. 01.01.2019 या अर्हता
दिनांकावर मतदार नोंदणीस पात्र असलेल्या भविष्यातील मतदारांची माहिती गोळा करणे.
c)
मतदार
यादीत दुबार नावे असलेले मतदार/ मयत मतदार/ कायम स्थलांतरीत झालेले मतदार यांची
माहिती गोळा करणे.
d) ज्या मतदारांच्या नोंदीत चुका आहेत अशा
मतदारांच्या चुकीच्या नोंदी दुरूस्त करण्यासाठी माहिती गोळा करणे.
4)
मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व नविन सेक्शनची निर्मिती:- भविष्यातील सर्व मतदान प्रक्रियेसाठी
VVPATs (Voter Verifiable Paper Audit Trail) चा वापर करण्याचा निर्णय भारत
निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला असून, त्यासाठी शहरी मतदान
केंद्रास जोडलेली मतदार मर्यादा 1400 तर ग्रामिण मतदान केंद्रास
जोडलेली मतदार मर्यादा 1200 इतकी निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा मतदारसंघात संबंधीत उपविभागीय
अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी/ तहसिलदार तथा सहाय्यक मतदार
नोंदणी अधिकारी यांचे मार्फत अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पडताळणी
करून भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार मर्यादेनुसार मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण
दि. 21 जुन, 2018 ते दि.
31 जुलै, 2018 या कालावधीत करण्यात येणार
आहे.
5)
प्रारूम मतदार याद्यांची प्रसिध्दी व दावे व हरकती स्विकारण्याचा
कालाधी:- भारत निवडणूक आयोगाकडून दि.
01.01.2019 या अर्हता दिनांकवार अधारीत मतदार याद्यांच्या घोषीत करण्यात
आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 01 सप्टेंबर, 2018 रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी
करण्यात येणार असून, दि. 01 सप्टेंबर,
2018 ते दि. 31 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत मतदार नोंदणीस पात्र असलेल्या नागरिकांकडुन संबंधी मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी (BLO), तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
(AERO)/ उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी
(ERO) यांचे मार्फत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तसेच
नागरीकांना आपले वैयक्तीक दावे व हरकती http://www.nvsp.in/ या पोर्टलव्दारे ऑनलाईन स्वरूपात सादर करता येतील. दिनांक: 01 जानेवारी, 2019 रोजी
ज्या भारतीय नागरीकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्याची जन्म तारीख
दिनांक: 01 जानेवारी, 2001 अथवा त्यापुर्वीची आहे व जो संबंधीत भागाचा सामान्य
रहिवासी आहे असा भारतीय नागरीक संबंधीत यादी भागात मतदार म्हणून नोंदणीस पात्र
आहे.
6) नागरिकांनी/ मतदारांनी कोणत्या हेतूस्तव कोणते अर्ज भरावेत
त्याचे विहीत नमुने पुढील प्रमाणे आहेत.
बाब
|
विहीत नमुना
|
मतदार
यादीत नवीन नांव समाविष्ट करण्यासाठी किंवा अन्य मतदार संघातील नाव सध्याच्या
मतदारसंघात स्थलांतरीत करण्यासाठी
|
नमुना
नं. 6
|
मतदार
यादीतील नांवावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नांवाची वगळणी करण्यासाठी
|
नमुना
नं. 7
|
मतदार
यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये दुरूस्ती करण्यासाठी
|
नमुना
नं. 8
|
मतदार
यादीतील नांव त्याच विधानसभा मतदार संघात स्थलांतरीत करण्यासाठी
|
नमुना
नं. 8अ
|
मतदारांनी
विविध हेतूस्तव भरावयाचे उपरोक्त सर्व नमुन्यातील अर्ज हे दि. 01 सप्टेंबर, 2018
ते दि. 31 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी
अधिकारी (ERO),
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांची कार्यालये /
सर्व मतदान केंद्रे आणि सर्व मतदार मदत केंद्रे येथे उपलब्ध आहेत. संबंधीत
नागरीकाने योथोचित्तरित्या भरून स्वत: सादर केलेले अर्ज उपरोक्त सर्व ठिकाणी
स्विकारले जातील. दिनांक: 01 सप्टेंबर, 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द
झाल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत अथवा
प्रारूप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदी बाबत ज्या मतदारांना आक्षेप
घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरूस्ती/ सुधारणा करावयाच्या असतील अशा
मतदारांनी उपरोक्त विहीत नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
7) सदर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत भारत निवडणूक
आयोगाची मान्यता प्राप्त राजकिय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे
“मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता” (BLA) यांच्या नियुक्त्या करता येतील. भारत
निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनी यथोचितरित्या नियुक्त केलेल्या “मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता” (BLA) यांना संबंधीत यादीभागाचे बाबतीत दररोज 10
दावे व हरकती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे
सादर करता येतील. दावे व हरकती स्विकारण्याच्या संपुर्ण कालावधीत “मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता” (BLA) यांनी 30 किंवा त्यापेक्षा जास्त दावे व
हरकती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे सादर
केल्यास सदर दावे व हरकतीच्या सत्यतेची पडताळणी संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी (AERO)/ उपविभागीय अधिकारी तथा मतदार
नोंदणी अधिकारी (ERO) यांचे मार्फत करण्यात येईल. तसेच “मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता” (BLA) यांनी सादर केलेल्या दावे व हरकती सोबत सदर
दावे व हरकती त्यांनी वैयक्तीकरित्या तपासल्या असून त्या बरोबर असल्याबाबतचे स्वंय
घोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
8) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950
अन्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीचे अनुपालन करून, छायाचित्र मतदार याद्यांच्या
सतत पुनरिक्षण कार्यक्रमात, मयत झालेले मतदार, अन्यत्र स्थलांतरीत झालेले मतदार, दुबार
नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे संबंधीत मतदान केंद्रस्तीय अधिकारी (BLO), तहसिलदार तथा सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच उपविभागीय अधिकारी तथा
मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांचे पडताणीअंती वगळण्यात
आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या आणि दि. 01 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर
आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत
वगळण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावांची यादी, सर्व उप विभागीय अधिकारी तथा मतदार
नोंदणी अधिकारी (ERO)/ तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी
अधिकारी (AERO)/ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
(DEO) यांची कार्यालये तसेच https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर मतदारसंघ व
भागनिहाय उपलब्ध आहे.
9) हिंगोली जिल्ह्यातील उपविभागीय
अधिकारी तथा मतदार नोंदणी आणि तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचा तपशिल पुढिल प्रमाणे आहे.
अ.क्र.
|
अधिकारी यांचे नांव
|
पदनाम
|
दुरध्वनी क्रमांक
|
1
|
डॉ. ज्ञानोबा
बानापुरे
|
उप विभागीय अधिकारी
तथा मतदार नोंदणी अधिकारी, वसमत.
|
02454- 221016
|
2
|
श्री.
प्रशांत खेडेकर
|
उप विभागीय अधिकारी
तथा मतदार नोंदणी अधिकारी, कळमनुरी.
|
02455- 230121
|
3
|
श्री.
प्रशांत खेडेकर
|
उप विभागीय अधिकारी
तथा मतदार नोंदणी अधिकारी, हिंगोली.
|
02456- 221452
|
4
|
श्रीमती.
ज्योती पवार
|
तहसिलदार तथा
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, वसमत.
|
02454- 220028
|
5
|
श्रीमती. प्रतिभा
गोरे
|
तहसिलदार तथा
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, कळमनुरी.
|
02455-230021
|
6
|
श्री.
गजानन शिंदे
|
तहसिलदार तथा
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, हिंगोली.
|
02456- 221902
|
7
|
श्री.
पांडूरंग माचेवाड
|
तहसिलदार तथा
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, औंढा (ना.)
|
02456-
260047
|
8
|
श्रीमती
वैशाली पाटील
|
तहसिलदार तथा
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, सेनगाव.
|
02456-
250216
|
टीप:-
कोणतीही व्यक्ती जे खोटे आहे असे तिला माहिती आहे किंवा जे खोटे आहे असे तिला
वाटते किंवा जे खरे असे तिला वाटत नाही असे निवेदन किंवा प्रतिज्ञापन करील ती
व्यक्ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 अन्वये शिक्षेस पात्र ठरेल अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी , असे
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment