मौजे वगरवाडी
सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.15: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे
कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा , जि.
हिंगोली येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात दिनांक 16 मे ते
14 जून 2018 पर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना वार्षिक गोळीबार सराव करण्यास परवानगी देण्यात येत आहे
.
दिनांक 16,18 मे
आणि 9,12,14 जून 2018 या दिनांकांस खालील अटीवर गोळीबार सरावासाठी मैदान उपलब्ध करुन देण्यात येत
आहे. सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात
आले आहे परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या
क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस अधिकारी
यांनी दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे संबंधित गावी सर्व
संबंधितांना द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हट्टा यांनी मौ.
वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीद्वारे व
ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त
जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000
No comments:
Post a Comment