जिल्ह्यात कलम 144 लागू
जिल्ह्यातील 8 केंद्रावर 1872 परीक्षार्थी देणार महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाची परीक्षा
हिंगोली, दि.09: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात
येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा दि. 13 मे, 2018 रोजी
सकाळी 10:30 ते 12:00 या वेळेत घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षा जिल्ह्यातील 08
उपकेंद्रावर घेण्यात येणार असून या उपकेंद्रावर 1872 परीक्षार्थी परीक्षा देणार
आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी परीक्षेसाठीचे 08
परीक्षा केंद्र परीसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार असून सदर परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणेमार्फत
तपासणी करण्यात येणार आहे.
या परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परीसर यामध्ये परीक्षेच्या
शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता
येणार नाही. परीक्षा
केंद्राच्या 100 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ चालू ठेवण्यास मनाई करण्यात येत
आहे. तसेच डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल
फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने दुरसंचार साधने अथवा शासनाने
बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसर अथवा परीक्षा
कक्षात आणण्यास अथवा बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल
फोन/दुरसंचार साधनासह आयोगाने बंदी घातलेले इतर कोणतेही साहित्य आढळुन आल्यास तसेच
कॉपीचा / गैरप्रकाराचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द
फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्व संबंधीत परीक्षार्थीनी नोंद
घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment