तंबाखुजन्य
पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा
हिंगोली,दि.31: 31 मे हा दिन ‘तंबाखुजन्य पदार्थ विरोधी दिन’
म्हणुन पाळला जातो. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबाखुजन्य पदार्थ
विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) पांडुरंग बोरगावकर उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment