16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यु
दिन
राष्ट्रीय
डेंग्यु दिनानिमित्त जनजागृतीकरीता विविध उपक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि.
15: राज्यात तापाच्या साथीमध्ये प्रामुख्याने डेंगी, चिकुणगुनिया रुग्ण संख्येत
वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या उन्हाळा सुरु आहे . राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाण्याचा तुटवडा
असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने
लोकाची पाणी साठवण्याची प्रवृत्ती आढळून येते.
त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्त डास अंडी
घालून डासोत्पत्ती होते . या डासांची उत्पत्ती कमी करणे / नियंत्रणात ठेवणे यासाठी
जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक
आहे . लोक सहभागाशिवाय या आजाराचे
नियंत्रण शक्य नाही . राष्ट्रीय डेंग्यू
दिन दिनांक 16 मे रोजी डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती
निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने
प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरीकांपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा
या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे .
केंद्र शासनाने
डेंग्यू विषयावर मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले
आहे. त्याचप्रमाणे अँड्रॉईड मोबाईलवर प्लेस्टोअर मध्ये जावून इंडिया
फाईटस डेंग्यू हे ॲप शोधावे व मोबाईलवर ते डाऊनलोड करुन घ्यावे . यामध्ये डेंग्यू विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. या
ॲपचा प्रचार आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या
माध्यामातून सर्व जनतेत होईल असे पाहावे, यामध्ये पत्रकार परीषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण
सर्व्हेक्षण, तालुकास्तर सभा , सर्व
स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन , बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी
कार्यशाळेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात
गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सर्वस्तरावरील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा
पाळणे या विषयी जनजागृती जनतेमध्ये
निर्माण करणे.
राष्ट्रीय डेंग्यू दिन
यशस्वी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक
प्रतिष्ठित नागरीक यांचा लोकसहभाग घेवून गावपातळीवर
सदरील राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात यावा असे जनतेस जाहिर आवाहन
करण्यात येत आहे तसेच जनतेस डेंग्यू, चिकुणगुनिया बाबतचे लक्षणे, उपचार उपाययोजना , शासकीय योजनांची माहिती , शासकीय योजनांबरोबर जनतेच्या
सहकार्याची आवश्यकता, डासोत्पत्ती
नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता , परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर , डासांच्या चाव्यापासून
रक्षणासाठी विविध उपाय , कोरडा दिवस पाळून किटकजन्य
आजार डेंग्यू, चिकुणगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास
जनतेने सहकार्य करणे, जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
000000
No comments:
Post a Comment