वृत्त क्र.52 दिनांक
: 15 फेब्रुवारी 2018
हिंगोली येथे 17 फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन
हिंगोली,
दि.15: कृषी
तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने येथील रामलीला मैदानावर 17 ते
21 फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिह्यातील कृषि
व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभुत ठरेल व शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ होईल, हे उद्दिष्ट
ठेवत या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या
हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या कृषि महोत्सवात
शनिवार, दिनांक 17
फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 वाजता हळद लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या
विषयावर कृषि विज्ञान केद्र, तोंडापूर येथील मार्गदर्शक विशेषज्ञ प्रा.
अनिल ओळंबे मार्गदर्शन करणार आहेत. तर भुईमुग लागवड व बीजोत्पादन
तंत्रज्ञान या विषयावर ,
प्रगतशील भुईमुग उत्पादक , जिंतूर जि. परभणीचे
श्री. मधुकरराव घुगे आणि सायंकाळी श्री.
रामपाल महाराज यांचे सप्तखंजिरी वादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवार
दिनांक 18 फेब्रुवारी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान हळद निर्यात संधी
व व्यवस्थापन या विषयावर श्री. गोविंद हांडे , तंत्र अधिकारी निर्यात कक्ष कृषि
आयुक्तालय, पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत. कृषि प्रक्रिया उद्योगातून
समृध्दीकडे या विषयाचे मार्गदर्शन जालना येथील
कृषि प्रक्रिया उद्योजिका श्रीमती सिताबाई मोहिते करणार आहेत तसेच
शाहीर श्री. दांडेकर आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सोमवार
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान शाश्वत शेतीची
गुरुकिल्ली पशुधन व्यवस्थापन विषयावर डॉ. नितीन मार्कंडेय विभाग प्रमुख पशुवैद्यक
महाविद्यालय, परभणी यांचे मार्गदर्शन
होणार आहे. मधुमक्षिका पालन एक फायदेशीर
व्यवसाय या विषयावर
दिनकर पाटील, प्रगतशील मधुमक्षिका
पालक, चाकूर जि. लातूर यांचे मार्गदर्शन आणि
शाहीर श्री. धम्मपाल इंगोले आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मंगळवार
दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 कापूस बोंड
अळी नियंत्रण व व्यवस्थापन विषयावर डॉ.
सी.डी. मायी माजी
अध्यक्ष, भारतीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ, माजी कुलगुरु व.ना.म.कृ.वि. परभणी हे
मार्गदर्शन करणार आहेत. एकात्मिक शेती विकास व
समृध्द कुटुंब या विषयावर ज्ञानेश्वर बोडके, अध्यक्ष
अभिनव फार्मर्स क्लब, पुणे यांचे मार्गदर्शन
आणि शाहीर श्री नामदेव दिपके आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान मोत्याची शेती या विषयावर श्री.
संजय गंधाटे प्रगतशील शेतकरी
जि. गडचिरोली यांचे तर आधुनिक भाजीपाला
लागवड व रोपवाटीका व्यवस्थापन या विषयावर श्री. सुखदेव कनुंजे प्रगतशील शेतकरी
पलूस जि. सांगली यांचे मार्गदर्शन
होणार आहे. तसेच शाहीर श्री. शाम घोंगडे आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
होणार आहे.
या कृषि महोत्सवामध्ये कृषि
प्रदर्शन, शेतकरी व महिला बचत गटांच्या मालांचे तसेच सेंद्रिय शेती मालाचे प्रदर्शन
आयोजित केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित
कृषि तंत्रज्ञान, शेतीतील नाविन्यपूर्ण बाबी, शेतकऱ्यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन
इत्यादींबाबत माहितीपर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. याठिकाणी शेतीशी निगडीत
विविध कंपन्या, शेती अवजारे आदींचे स्टॉल राहणार आहेत. बचत गटांनी उत्पादित केलेली
उत्पादनेसुध्दा याठिकाणी विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी
या महोत्सवात सहभागी व्हावे. तसेच व्यावसायिक, उद्योजकांनी स्टॉल बुकिंग करण्यासाठी
‘आत्मा’ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मिलिंद जाधव
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment