अनधिकृत जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली,
दि. 27 :-मा. उच्च न्यायालय मुंबई
यांचे आदेशामधील नमूद
परिच्छेद क्र. 59 मधील (b)(e) व
(i) मध्ये नमूद केल्यानुसार अनधिकृत
जाहिराती , घोषणा फलक , होर्डींग , पोस्टर्स ई संदर्भाच्या अनुषंगाने नियंत्रण
ठेवण्याकरीता जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर ग्रामीण भागासाठी नोडल
अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी , असे निर्देश
दिले आहेत. मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या ओदशात नमूद
केल्याप्रमाणे जिल्हास्तरावर व तालुकास्तर
ग्रामीण भाग वरील अनधिकृत जाहिराती , घोषणा फलक, होर्डींग, पोस्टर्स ई संदर्भाच्या
अनुषंगाने नियंत्रण ठेवण्याकरिता
नोडल अधिकारी यांची खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे . श्री. लतीफ
पठाण , निवासी उपजिल्हाधिकारी , मो. 9422069786,
श्री. माधव बोथीकर , नायब तहसिलदार , हिंगोली मो.9850271785, श्री. पी.एन.
ऋषी , नायब तहसिलदार , कळमनुरी मो.9881569005, श्री. सचिन जैस्वाल , नायब तहसिलदार , वसमत मो. 9421324610, श्री. विरकुंबर, नायब तहसिलदार ,
मो.9623747459, श्री. पाठक , नायब
तहसिलदार , सेनगाव मो.9881592002 यांची नोडल
अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात
आली असून अनधिकृत जाहिराती , घोषणा फलक , होर्डींग , पोस्टर्स ई बाबत
मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक
31 जानेवारी 2017 रोजीच्या आदेशात नमूद
केलेल्या बाबीनुसार आपल्यास्तरावरुन
कार्यवाही करण्यात यावी. स्वा/- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , हिंगोली.
0000000
No comments:
Post a Comment