2 मार्च रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद
हिंगोली,
दि. 28 :- जिल्ह्यात दिनांक 2 मार्च रोजी धुलीवंदन हा सण साजरा केला
जात आहे . त्याअनुषंगाने या काळात
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था
राखण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी
यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा
वापर करुन असे आदेशित करण्यात येते की ,
हिंगोली जिल्ह्यातील सर्व किरकोळ
व ठोक मद्य विक्री अनुज्ञप्तीचे
व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्यात यावेत.
वरील
आदेशाचा भंग करणाऱ्या
अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई
दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक कारवाई
करण्यात येईल यांची सर्व
अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी .
0000000
No comments:
Post a Comment