दुकाने
व आस्थापना अधिनियमातील नियमावर हरकती, सूचना पाठवण्याचे आवाहन
हिंगोली,
दि.16:-महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम
-2017 हा कायदा दिनांक 19 डिसेंबर 2017 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.
या अधिनियमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन
) अधिनियम 2017 या नियमांचा मसुदा
एका अधिसूचनेव्दारे 2 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. हा मसुदा mahakamgar.maharashatra.gov.in या
शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून , त्यावरील हरकती व सूचना असल्यास
ते देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
या
संबंधीच्या सूचना व हरकती प्रधान सचिव (कामगार) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मादाम
कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - 400032 या पत्यावर अथवा psec.labour@maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
किंवा कामगार आयुक्त, कामगार भवन, ई-बलॉक, सी – 20 , वांद्रे (पूर्व),
मुंबई 400051 (mahalabourcommr@gmail.com) यांच्याकडे
या बातमीच्या प्रसिध्दी दिनांकापासुन 15 दिवसांच्या आत व्यक्तीश: किंवा टपालद्वारे
अथवा ई- मेलव्दारे सादर कराव्यात. या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना किंवा हरकतींचा
विचार करण्यात येणार नाही , असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी.
ई. कराड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment