अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून वैयक्तीक लाभाच्या
योजनांसाठी अर्जाची मागणी
हिंगोली,
दि. 27:- केंद्रवर्ती अर्थसंकल्प
योजना सन 2017-18 अंतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित
जमातीच्या (आदिवासी) शेतकरी
/सुशिक्षित बेरोजगार युवक /युवतींना वैयक्तीक लाभाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत . विहित नमुन्यातील अर्ज या
कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक
लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी ,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,
कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे
योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण
कागदपत्रांसह आवेदन अर्ज दिनांक 15
/03/2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर
करावा.
यामध्ये
आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरवठा करणे
, शिवन काम प्रशिक्षित आदिवासी महिला / पुरुषांना 85 टक्के
अनुदानावर शिलाई व पिकोफॉल मशिन पुरवठा करणे , आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर काटेरी तार पुरवठा करणे , गट ब
प्रशिक्षणाच्या योजना – आदिवासी युवक /युवतींना
मराठी/ इंग्रजी संगणक टायपींगचे
प्रशिक्षण देणे (अनिवासी) , आदिवासी युवक /युवतींना संगणक (MSCIT) प्रशिक्षण देणे (अनिवासी) , आदिवासी युवक /युवतींना PMT/PET/NEET
चे प्रशिक्षण देणे , आदिवासी
युवकांना नळ फिटींगचे (प्लंबींग) प्रशिक्षण
देणे (निवासी) , गट क मानव साधन संपत्ती विकासाच्या व
कल्याणात्मक योजना – आदिवासी
विद्यार्थ्यांना शाळेत जा ये
करण्याकरीता सायकल पुरवठा करणे (8 ते 12 वी वर्ग) या योजनेचा समावेश आहे. विहित
मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले आवेदन
अर्ज स्विकारले जाणार नाहीत .
उपरोक्त योजनांमध्ये पूर्णत: / अंशत: बदल करण्याचा तसेच त्यापैकी
कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न
राबविण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी यांनी
राखून ठेवलेला आहे . प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनुरी , जि. हिंगोली.
0000000
No comments:
Post a Comment