वृत्त क्र.48 दिनांक
: 2 फेब्रुवारी 2018
सन 2018 साठीच्या स्थानिक सुट्या
जाहिर
हिंगोली दि.02: परिक्रम्य संलेख अधिनियम 1881 अंतर्गत राज्य शासनाने संदर्भिय
शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या
अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी सन-2018 या वर्षाकरीता हिंगोली
जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टी जाहीर केल्या आहेत.
दिनांक
17 फेब्रुवारी 2018 रोजी ( शनिवार) रथोत्सव यात्रा औंढा ना., दिनांक 25 एप्रिल 2018 (बुधवार) रोजी हजरत सिरेहक
शाहबाबा उर्दू तीथी रहेमत तुल्ला का संदल उरुस (चिराग शहावली), आणि दिनांक 10 ऑक्टोबर
2018(बुधवार) रोजी घटस्थापनेनिमित्त स्थानिक सुट्या (राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील
कार्यालय, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयाखेरीज) हिंगोली
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालय, स्थानिक
स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व
इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू
राहतील, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment