वृत्त क्र.47 दिनांक
: 2 फेब्रुवारी 2018
महिला उद्योजक पुरस्काराकरीता अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगोली दि.02:
राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण-2017 दि. 14 डिसेंबर, 2017 रोजी राज्य शासनातर्फे
जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील उल्लेखनीय
कामगिरी केलेल्या महिला उद्योजकांना प्रशस्तीपत्र देवुन शासनाने गौरवण्याचे योजिले
आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी 2018 मध्ये
मुंबई येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018 समारंभात पुरस्कार स्वरुपात
सन्मानपत्र दयावयाचे आहेत. खालील पात्रता व निकष पूर्ण करणा-या महिला उद्योजकांकडून
अर्ज प्राप्त करावयाचे आहेत.एकल मालकी घटक-महिला उद्योजकांचे 100 टक्के भाग भांडवल,भागीदारी
घटक-भागीदारी घटक ज्यामध्ये 100 टक्के भाग भांडवल,सहकारी क्षेत्र-सहकारी कायद्यांतर्गत
ज्या सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असलेली संस्था,खाजगी किंवा
सार्वजनिक मर्यादित घटक-ज्या घटकामध्ये महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल
असेल अशी कंपनी,स्वयं सहाय्यता बचत गट-जो बचत गट नोंदणीकृत असून, सदर व्याख्येतील क्रमांक
3 आणि 4 नुसार स्थापित झालेले आहे. ( उद्योगांच्या उपरोक्त नमुद केलेल्या घटकांमध्ये
किमान 50 टक्के महिला कामगार असलेल्या उपक्रमांना योजने अंतर्गत प्रोत्साहनासाठी पात्र
समजण्यात येईल.)
` या पुरस्काराकरीता पुढीलप्रमाणे निकष असणार असून पुरस्कारार्थी महिला उद्योजिका ही दि. 14 डिसेंबर, 2017 च्या
शासन निर्णयामध्ये विहीत करण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या व्याख्येमध्ये बसणारी
असावी. उद्योग घटक गेल्या 3 वर्षात सतत उत्पादनात असावा, सदरच्या महिला उद्योग घटकास
राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत यापूर्वी कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा,उद्योग
घटकांची निवड करताना विविध मुदयांचा समावेश करण्यात येईल जसे गेल्या 3 वर्षात घटकाचे
उत्पादन, रोजगार निर्मिती, गुंतवणुक व नफा याद्वारे दिलेल्या वाढीचा दर, तंत्रज्ञानाची
निवड व वापर (स्वत: विकसीत केलेले/स्वदेशी/परदेशी), उद्योजकेची पार्श्वभुमी, प्रथम
पिढीची उद्योजिका आहे किंवा कसे ? उद्योग उभारणीत स्वावलंबित्व उद्योगाच्या स्थानाची
निवड, उत्पादनाचा विकास (संशोधन व विकासासाठीचे प्रयत्न, गुणवत्ता नियंत्रणासाठीची
उपाय इ.), आयात पर्यायी उत्पादन व निर्यात,
डायर्व्हसिफीकेशन व बाजारपेठेत नव्या उत्पादनाचा यशस्वीपणे समावेश, उद्योगाचे व्यवस्थापन
यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल, लेखे, मार्केटिंग बाबत, कामगार कल्याण, उद्योजिका अनु.जाती/अनु.जमातीची
असल्यास अधिकचे गुण इ.निकषांचा विचार करुन पुरस्कार देण्यात येतील. विहित पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक महिला उद्योजकांनी दि.
05 फेब्रूवारी, 2018 पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रांसह महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, एस-12 हिंगोली (दु.क्र. 02456- 222218 E-mail- didichingoli@maharashtra.gov.in) येथे सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र , हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment