सन
1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत याआंदोलनामध्ये
भाग
घेतलेल्या व्यक्तींची माहिती सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 22 : सन
1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत याआंदोलनामध्ये भाग घेतलेल्या व त्याअनुषंगाने
कारावास भोगलेल्या व्यक्तींची माहिती
त्यांचे नाव , पत्ता, दूरध्वनी क्र. /मो.क्र. आणीबाणी काळातील आंदोलनातील त्यांचा सहभाग/ केलेल्या कार्याची माहिती
शासनस्तरावर तात्काळ सादर करावयाची आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सदर आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींची माहिती त्यांचे नाव , पत्ता,
दूरध्वनी क्र./मो.क्र याविषयीची माहिती
मागविण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सन 1975 ते 77 या आणीबाणी
कालावधीत या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींनी संबंधित तहसिल कार्यालयाकडे
दिनांक 8 मार्च 2018 पर्यंत अर्ज सादर करावे , विहित कालावधी संपल्यानंतर अर्ज
स्विकारला जाणार नाही , असे अपर जिल्हादंडाधिकारी
यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment