पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी
गारपीट व अवेळी पावसाने झालेल्या शेती पिकाची केली पाहणी
हिंगोली, दि. 17 : जिल्ह्यात
गारपीट व अवेळी झालेल्या शेती पिकाची पाहणी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली
तालुक्यातील मौजे आडगांव, भिंगी व लिंबाळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गहु, हरभरा
व हळद पिकाची पाहणी केली.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे,
प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी विजय लोखंडे, तहसिलदार गजानन शिंदे, व गावातील नागरिक यांची मोठ्या संख्येने
उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री दिलीप
कांबळे यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांना धीर दिला. गारपिटीमुळे
नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला शासनाच्या निकषानुसार तातडीने दिला जाईल असा दिलासाही
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
*****
No comments:
Post a Comment