03 September, 2018

गोरखनाथ मंदिर वाई येथील पोळा सणानिमित्त वाहतूकीत बदल


गोरखनाथ मंदिर वाई येथील पोळा सणानिमित्त वाहतूकीत बदल

          हिंगोली,दि.3: प्रतिवर्षी प्रथे व परंपरेप्रमाणे 9 सप्टेंबर 2018 रोजी  पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 10 सप्टेंबर रोजी कर सण साजरा करण्यात येणार आहे. कर सणानिमित्ताने पो. स्टे. कुरुंदा हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 50 ते 60 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्या करीता  त्याचे मालक घेऊन येतात त्यामुळे  वसमत औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लेाकांची बरीच गर्दी होते. व सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने सदर रोडवर वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू असते व सदर दिवशी वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टि पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दिनांक 9 सप्टेंबर, 2018 चे 00.00 ते दिनांक 10 सप्टेंबर,2018 रोजीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा  जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतुक ही नागेशवाडी मार्गे जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यास विनंती केली आहे.
                पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतुक मोठ्या  प्रमाणावर चालू असते व सदर दिवशी  वाहतुक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.
                त्याकरीता वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दिनांक 9 सप्टेंबर चे 00.00 ते दि. 10 सप्टेंबर रोजीचे 24.00 वाजेपावेतो बंद करण्यात येत असून, नांदेडकडून येणारी वाहतुक वसमत मार्गे झिरो फाटा ते हट्टा- जवळा बाजार मार्गे नागेशवाडी अशा पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेड जाणारी वाहने नागेशवाडी, मार्गे  जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

No comments: