चामडी वस्तु च्या खरेदीवर 50 टक्के सुट
हिंगोली, दि.6: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मोद्योग विकास महामंडळ मर्यादित लिडकॉम लि.एम.आय.डी.सी.,
लिंबाळा (मक्ता) हिंगोली येथील महामंडळाचे उत्पादन केंद्र मराठवाड्यातील एकमेव उत्पादन
केंद्र असून येथे शासकीय व निमशासकीय कार्यालयास लागणारे ऑफीस लेदर बॅग/सिक्युरिटी
शुज/लेदर बेल्ट/लेदर पाकीट या शिवाय फॅन्सी पि.यु. जेन्टस चप्पल/फॅन्सी लेडीज चप्पल/महामंडळाच्या
कामगारामार्फत अस्सल चामडी वस्तु बनवण्याचे एकमेव ठिकाण आहे. या महामंडळाचे उत्पादन
केंद्र दर्यापुर जिल्हा अमरावती कोल्हापूर / सातारा व विक्री केंद्र धुळे / जळगाव
/ नांदेड / सोलापूर / वाशी / बांद्रा अशा ठिकाणी किरकोळ मालाची विक्री केंद्रे आहेत.
सध्या हिंगोली उत्पादन केंद्रात मान्सुन डिस्काऊंट व दसरा दिपावळीच्या सणानिमित्त
ग्राहकांच्या खास आग्रस्तव अस्सल चामडी वस्तुवर 50 टक्के सुट काही ठरावीक मालावर आयोजीत
करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन व्यवस्थापक, लिडकॉम
हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे
****
No comments:
Post a Comment