18 सप्टेंबर रोजी
पेन्शन अदालतीचे आयोजन
हिंगोली,दि.11 : केंद्र
शासनाच्या निवृत्तीवेतन व विवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या पत्रान्वये देशामधील
संबंधित राज्य व केंद्रशासीत प्रदेशामध्ये पेन्शन अदालत करण्याचे सूचित केले आहे.
त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत निवृत्ती वेतन मंजूर न झालेल्या
सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांची निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी
दिनांक 18 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई व नागपूर येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले
आहे.
त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी
आपआपल्या कार्यालयातील प्रलंबीत, मंजूर न झालेले निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली
काढण्यासाठी नागपूर येथील पेन्शन अदालत मध्ये जाऊन प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन
जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment