तोष्णीवाल महाविद्यालय येथे ‘लोकराज्य’ वाचक मेळावा संपन्न
हिंगोली,दि.26: सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय येथे आज ‘लोकराज्य’ वाचक मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुळे,
जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, प्रा. धनाजी पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणारे
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिका विषयी तसेच स्पर्धा
परीक्षेच्या तयारीसाठी ‘लोकराज्य’ मासिक कसे उपयुक्त आहे याची ही माहिती यावेळी
विद्यार्थी-विद्यार्थीनीना देण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुळे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण
सुर्यवंशी यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. , प्रा. धनाजी पाटील यांनी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रा. शंकर पजाई यांनी सूत्रसंचालन केले तर
प्रा. कुलदीप पवार यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन
विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांची
उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment