लोकराज्य
विशेषांकाचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते प्रकाशन
हिंगोली,
दि.12: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या
लोकराज्यच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे’ विशेषांकाचे
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आणि जिल्हा
माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी उपस्थित होते.
या
विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर
यांनी शैक्षणिक क्रांती विषयावर संपादकीय मधून राजर्षी शाहू महाराज यांच्या
कार्यावर प्रकाश टाकला आहे. अंकामध्ये डॉ. विनय
सहस्त्रबुद्धे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे,
डॉ. भालबा विभूते, डॉ. गो. मा पवार, धनराज माने आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज
व शैक्षणिक क्रांती या विषयाच्या अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच उद्योजकता व
कौशल्य विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या कर्ज व्याज परतावा योजना,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध यशकथा आहे. असा संग्राह्य
वाचनीय अंक प्रत्येकाने वाचावा, तसेच लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे
आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले.
|
|
00000
No comments:
Post a Comment