शिष्यवृत्तीचे
ऑनलाईन अर्जाकरीता 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत
हिंगोली,दि.11: जिल्ह्यातील सर्व
शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे
प्राचार्य व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु. जाती, विमुक्त जाती व भटक्या
जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी यांनी सन 2019-20 या
वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू
महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या
विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबिटी या संगणक
प्रणालीवर अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 आहे. या तारखेनंतर शिष्यवृत्तीचे अर्ज
ऑनलाईन सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.
विहित मुदतीत अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे मुळ स्वरुपात स्कॅन करुन
अपलोड करावीत. अपूर्ण कागदपत्रे असलेले शिष्यवृत्ती अर्ज फॉरवर्ड करण्यात येणार
नाही. तसेच असे अर्ज रद्द करण्यात येतील.
पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व महाविद्यालयांनी विहित मुदतीत अर्ज
करणेसाठीची प्रक्रीया पूर्ण करावी. तसेच महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर अंतिम
दिनांकाबाबत विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,
हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment