जिल्हास्तरीय
सल्लागार समिती बैठक संपन्न
हिंगोली,दि.11: जिल्हास्तरीय
सल्लागार समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली
पार पडली. या बैठकीस भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण सिंदकर,
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक पी.एम. जंगम, जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार
प्रशिक्षण केंद्राचे संचालक धनाजी बोईले, जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती उपक्रमाचे प्रकल्प संचालक डॉ. घुले व
जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान नाबार्डने बनवलेल्या संभाव्य पतपुरवठा आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या आराखड्यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी
संभाव्य पतपुरवठा रु. 2334.65 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पीक
कर्ज रु. 1443.47 कोटी, शेती मुदत कर्ज रु. 273.58 कोटी, लघु, मध्यम व छोटे उद्योग
रु. 335.68 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्ह्यातील
सर्व बँकांना रब्बी हंगामातील पीक कर्जाची उद्दिष्टे पूण करण्याच्या सूचना दिल्या.
****
No comments:
Post a Comment