विविध क्षेत्रातील व्यावसायामध्ये बालकामगार
कामावर न ठेवण्याचे आवाहन
हिंगोली,दि.07: जिल्ह्यात बालकामगार प्रथेविरुध्द दि. 7 नोव्हेंबर
ते दि. 7 डिसेंबर, 2019 या कालावधीमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये वीटभट्टीवर, हॉटेल व्यावसायीकांनी,
औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायीकांनी बालकामगार
कामावर ठेवू नये. आस्थापनावर बालकामगार असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर सक्तीची
कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment