राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
हिंगोली,दि.16: जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने आज ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’
साजरा करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी
पत्रकार सर्वश्री राकेश भट, श्याम सोळंके, प्रद्यूम्न गिरीकर,
विजय पाटील, केशव जोशी, विलास जोशी , नजीर अहमद पुसेगांवकर, एहसानखान पठाण, उत्तम
बलखंडे, हाफीज बागवान, सुधाकर वाढवे, श्रीरंग सिरसाट, श्रीमती शांताबाई मोरे आणि जिल्हा माहिती
अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
वृत्तपत्र स्वातंत्र्याची आणि पत्रकारितेतील वृत्तपत्र
स्वातंत्र्याची जपणूक होऊन पत्रकारीतेतील उच्च मुल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी
प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची 16 नोव्हेंबर, 1966 रोजी स्थापन करण्यात आली. या
अनुषंगाने सन 1997 पासुन दरवर्षी 16 नोव्हेंबर हा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचा
स्थापना दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो. यावेळी
राकेाश भट, प्रद्युम्न गिरीकर आणि अरुण सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करत सर्व
पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता
जिल्हा माहिती कार्यालयातील अनिल चव्हाण, कैलास लांडगे, श्रीमती आशा बंडगर आणि
परमेश्वर सुडे यांनी सहकार्य केले.
****
No comments:
Post a Comment