बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहात निमित्त जनजागृतीपर
कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 19: बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर
2019 या कालावधीत राबविला जात आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचे बालकांचे हक्क यावरील अधिवेशन
यास 20 नोव्हेंबर 2019 रोजी 30 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून दिनांक 16 नोव्हेंबर रोजी गणेशवाडी
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांचे हक्क, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच
आरोग्याविषयी जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर सप्ताह महाराष्ट्र पोलीस महिला व बालविकास विभाग, शिक्षण
विभाग, चाईल्ड लाईन व युनिसेफ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या विद्यमाने राबविण्यात
येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment