14 November, 2019

धर्मापुरी येथील जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल शाळा आदिवासी विकास विभागाकडून रद्द


धर्मापुरी येथील जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल
 शाळा आदिवासी विकास विभागाकडून रद्द

         हिंगोली, दि.14 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली अंतर्गत असलेली नामांकित इंग्रजी शाळा जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, धर्मापुरी जि. परभणी या शाळेत इयत्ता 1 ली या वर्गात 54 विद्यार्थ्यांना या कार्यालयाकडून प्रवेश देण्यात आला होता.
      सदरची शाळा सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी विकास विभागाकडून रद्द करण्यात आली असल्याने प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडून प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सद्य:स्थितीत आपले पाल्य इयत्ता 5 वी मध्ये शिकत असल्याने सदरील शाळेऐवजी आपल्या पाल्यांना दिपावलीच्या सुट्टीनंतर एम.डी.ए. रॉयल इंटरनॅशनल स्कूल कोळपा, ता. जि. लातूर या नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात यावेत.
         जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, धर्मापुरी जि. परभणी या शाळेत प्रवेश ठेवल्यास सदरील कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी केले आहे.
****

No comments: