30 November, 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील लाभार्थ्यांनी त्यांचा डाटा 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याचे आवाहन


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील
 लाभार्थ्यांनी त्यांचा डाटा 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.30: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची माहिती आधार संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 4 हजार 116 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 104 लाभार्थ्यांना मान्यता देऊन 4 हजार सात शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेमधील लाभार्थी यांचा डाटा आधार लिंक नसल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकत असल्याने केंद्र शासनाने सदरची बंधनकारक असलेली अट लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक करण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंतच शिथील केली आहे. त्यानंतर याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही . तसेच या योनजेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नर मध्ये फार्मर रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, सर्व लाभार्थ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत डाटा आधार लिंक करुन घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी  केले आहे.
0000

No comments: